📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
ई-चलन दंडावर ५०% सूट
07 मार्च 2026

ई-चलन दंडावर ५०% सूट

ई-चलन दंडावर ५०% सूट देण्याची घोषणा राज्य सरकारने १० डिसेंबर २०२५ रोजी हिवाळी अधिवेशनात केली होती. या निर्णयाचे राज्यातील लाखो वाहनचालकांनी स्वागत केले होते. मात्र आजपर्यंत शासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उलट वाहतूक विभागाकडून दंड वसुलीची मोहीम सुरूच आहे, त्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने राज्य सरकारला मागणी करण्यात येते की, हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेली ई-चलन दंडावर ५०% सूट तात्काळ लागू करावी आणि तोपर्यंत सुरू असलेली दंड वसुली मोहीम थांबवावी. जर मार्च महिन्यात शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने सर्वप्रथम सोलापूर बंद आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही शासनाने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. — रियाज सय्यद प्रदेश अध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ