📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
वाहनचालकांकडून कल्याणकारी मंडळाच्या सभासद फीची बळजबरी: प्रकाराविरोधात निवेदन
27 जून 2026

वाहनचालकांकडून कल्याणकारी मंडळाच्या सभासद फीची बळजबरी: प्रकाराविरोधात निवेदन

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र रिक्षा, टॅक्सी, ऑटो चालक कल्याणकारी मंडळाच्या नावाखाली वाहनचालकांकडून फीची सक्तीने वसुली केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे कल्याणकारी मंडळाचे सभासद नसलेल्या चालकांना वाहन फिटनेस प्रमाणपत्र देण्यात अडथळे निर्माण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही कल्याणकारी मंडळाचे सभासद होणे अथवा न होणे हा संबंधित चालकांचा पूर्णपणे स्वेच्छेचा विषय आहे. मात्र, सभासदत्वाची सक्ती करून वाहन फिटनेससारखी कायदेशीर व नियमित प्रक्रिया त्याच्याशी जोडणे हे नियमबाह्य, अन्यायकारक आणि सर्वसामान्य वाहनचालकांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. यावेळी शहर संपर्क प्रमुख शेख नबी शेख करीम कुरेशी, शहर संघटक वसीम अली कलीम अली, शहर सल्लागार आसिफ खान हाजी साहेब, शहर सदस्य रिजवान खान, शहर अध्यक्ष जब्बार खान, शहर संघटक संजय शिंदे, माजी शहर अध्यक्ष किरण दाभाडे, माजी शहर कार्यकारिणी सदस्य मुश्ताक शाह, तसेच तैसीफ शेख, फारुख तडवी, करीम शेख (उर्फ राजू), मोहम्मद रफिक, रईस, कैलास अहिरे, इब्राहीम शेख, प्रवीण अहिरे उपस्थित होते. संघटनेने इशारा दिला आहे की, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी व ऑटो चालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.