📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
आरटीओतील मराठी सक्तीला धार्मिक वळण; रिक्षा चालक वाहतूक संघटनेने केला आरोप
10 जुलै 2026

आरटीओतील मराठी सक्तीला धार्मिक वळण; रिक्षा चालक वाहतूक संघटनेने केला आरोप

रिक्षा चालकांमध्ये मराठी भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी आरटीओमध्ये 'महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा' सुरू आहे. या अभियानावरून वाद निर्माण झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असतानाही केवळ मुस्लिम असल्यामुळेच स्वतंत्र मराठी भाषा प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केली जात आहे, असा आरोप वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने केला आहे. रिक्षा चालकांना सक्ती करणे हा प्रकार संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. निवेदनामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरटीओमध्ये मराठी भाषा प्रमाणपत्र संदर्भात आयोजित शिबिरामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. ज्योती ठाकरे यांनी धर्माच्या आधारावर भेदभाव करणारे वक्तव्य केल्याचा आरोप वाहतुक संघटना संयुक्त महासंघाने निवेदनातून केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. रिक्षा चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी रिक्षा चालकांना मोफत मराठीचे धडे दिले जात आहेत. राज्याचा मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संस्था यांच्याकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र आरटीओकडून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा बाबतचा उपक्रम राबवण्यात येत आहे.