📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
महासंघाच्या निवेदनाला यश; बाईक टॅक्सीवर मोठी कारवाई
16 ऑगस्ट 2026

महासंघाच्या निवेदनाला यश; बाईक टॅक्सीवर मोठी कारवाई

तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि. १४ ऑगस्ट- सोलापूर शहरात अॅपच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सीविरोधात वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. एकाच दिवसात ११ बाईक टॅक्सीवर कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगाराच्या संरक्षणासाठी वाहतूक संघटना संयुक्त म हासंघाने बाईक टॅक्सीच्या प्रश्नावर राज्यव्यापी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. दैनिक तरुण भारत नेही हा प्रश्न ठळकपणे मांडला होता. त्याची दखल घेत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ११ ऑगस्ट रोजी आदेश काढून विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी कारवाईचे स्वागत केले. चालकांच्या न्याय्य मागणीला हे मोठे यश असून, रोजगाराच्या संरक्षणासाठी महासंघाचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.