16 ऑगस्ट 2026
जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि. २३ जुलै-
जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक
नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून, विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे निषेधार्ह असल्याचे महासंघाने म्हटले आहे. महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन
केंद्र सरकार व संबंधित राज्य शासनाकडे पाठविण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.