📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक संघटनेचे पोलसांना साकडे
16 ऑगस्ट 2026

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक संघटनेचे पोलसांना साकडे

सोलापूर, दि. २ ऑगस्ट- वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सिव्हिल सिग्नल ते किडवाई चौक मार्ग एकेरी करणे, विजापूर वेस मार्गे येणारी वाहने रंगभवन मार्गे वळवणे आणि अनधिकृत पार्किंगवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी महासंघाने केली आहे. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शहराध्यक्ष मनोहर खांडेकर, उपाध्यक्ष अस्लम शेख, शहर सचिव इरशाद शेख आणि सहसचिव अशोक बनसोडे व महासंघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.