📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
बाईक टॅक्सीविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा राज्यव्यापी एल्गार
16 ऑगस्ट 2026

बाईक टॅक्सीविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा राज्यव्यापी एल्गार

तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि. ६ ऑगस्ट- ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या खासगी अॅपबरोबरच भारत सरकारच्या भारत टॅक्सी अॅपमध्ये बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीचा तीव्र निषेधार्थ वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने राज्यव्यापी एल्गार पुकारण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोल ापूरसह जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, ठाणे, कल्याण, सातारा, पुणे, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांम ध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर परिणाम होणार असून, शासनाने २०१७ पासून खुले रिक्षा परवाने देऊन व्यवसायात आणलेल्या आणि लाखो रुपयांचे कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केलेल्या युवकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. खासगी व सरकारी सर्व अॅपमधील बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी. रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजग- ाराचे संरक्षण करणारे ठोस धोरण जाहीर करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.