16 ऑगस्ट 2026
बाईक टॅक्सीविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा राज्यव्यापी एल्गार
बार्शी प्रतिनिधी : तानाजी घोडके
सोलापूर, दि. ५ ऑगस्ट : वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज राज्यभर बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, ठाणे, कल्याण, सातारा, पुणे, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी संबंधित जिल्हाधिकान्यांना निवेदन सादर करष्यात आले.
महासंघाने निवेदनाद्वारे ओला, उबर, रॅषिडो यांसारख्या खासगी अॅपबरोबरच भारत सरकारच्या भारत टॅक्सी अॅपमध्ये बाईक टॅक सीला दिलेल्या परवानगीचा तीव्र निषेध नोंदविला.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होणार असून, शासनाने २०१७ पासून खुले रिक्षा परवाने देऊन व्यवसायात आणलेल्या आणि लाखो रुपयांचे कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केलेल्या युवकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
महासंघाने सरकारकडे खासगी व सरकारी सर्व अॅपमधील बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्याची, रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करणारे ठोस धोरण जाहीर करण्याची आणि चालक संघटनांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची मागणी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांनी सांगितले की, "रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणणारा कोणताही निर्णय महासंघ सहन करणार नाही. शासनाने तात्काळ बाईक टॅक्सीचा निर्णय मांगे घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल."